जालना : पावसाने जालन्यातल्या भोकरदनमध्ये केळणा नदीला पूर आला. अलापूरमध्ये एक दुचाकीस्वार या पुरात वाहून गेला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामस्थांकडून त्याचा शोध घेतला जातोय. दीपक मिरकर असं वाहून गेलेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यासोबत असलेल्या दत्ता जाधवनं दुचाकीवरून उडी मारल्यानं तो थोडक्यात बचावला.


काल रात्रीच्या सुमाराला ही दुर्घटना घडलीय. पुलावरच्या पाण्याचा अंदाज न आल्यानं दीपक वाहून गेल्याचे त्याचा मित्र दत्ताने सांगितले आहे.