सिंदखेडराजा : छत्रपती शिवाजी महाराजांना चारित्र्य, चातुर्य, संघटन कौशल्य अशा राजस सत्वगुणांची शिकवण देणा-या राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा आज स्मृतीदिन साजरा करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जीने युगंधर महापुरूष घडवला, जिच्या करारी बाण्यामुळं यवनांच्या गुलामगिरीतून बाहेर पडण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांना मिळाली, जीने हिंदवी स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतवलं, त्या जिजाऊ माँसाहेबांची आज जयंती. राज्यभरात त्यांची 419 वी जयंती उत्साहात साजरी झाली. 


यानिमित्तानं त्यांचं जन्मगाव असलेल्या सिंदखेडराजा इथं खास कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले. राज्यभरातून आलेल्या लाखो भक्तांनी लखुजीराव जाधवांच्या राजवाड्यावर जाऊन जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन अभिवादन केलं. त्यात राज्यमंत्री अर्जुन खोतकर, खासदार सुप्रिया सुळे,  खासदार प्रतापराव जाधव, आमदार शशिकांत खेडेकर, नगराध्यक्ष नाझेर आदींचाही समावेश होता.