आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर :  शेतकरी संघर्ष यात्रेच्या एसी गाड्यांवर टीका करण्यापेक्षा आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मातेचे अश्रू पुसा अशा शब्दांत आमदार जितेंद्र आव्हाड यांचे एसी गाड्यातील संघर्ष यात्रा टीकेला प्रत्त्युत्तर दिले आहे.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदारांचे निलंबन आणि कर्जमाफी हे मुद्दे विरोधी नेत्यांना आयते हाताला मिळाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील पळसगाव येथून शेतकरी संघर्ष यात्रा सुरु झाली. मात्र सर्व विरोधी नेते आणि आमदार वातानुकूलित वाहनातून यात्रेत सहभागी झाल्याबद्दल टीका होत आहे मात्र टीका करू नका त्यापेक्षा पळसगावातील आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मातेचे अश्रू पुसा असा सल्ला रा.कॉ. नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी दिला. 


विरोधी पक्षनेते  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील दाखल झाले. तेही कर्जमाफीची शोरूम आणि निलंबनाचे गोडाऊन असा हेतू मनी बाळगून. काँग्रेस, राष्ट्रवादी, रिपाई, सपा अशा विविध पक्षांचे विरोधी दिग्गज पळसगावी दाखल झाले. मात्र राज्यातील हे दिग्गज नेते शेतकरी हिटाची आणि कर्जमाफीची यात्रा वातानुकूलित वाहनातून काढत असल्याविषयी टीका सुरु आहे. 


मात्र हे टीका योग्य नसल्याचे सांगत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर प्रत्त्युत्तर दिले आहे. पहिल्या पानावरील जाहिराती म्हणजे सरकार संघर्ष यात्रेला घाबरले असल्याचे लक्षण आहे. 


एवढ्या उन्हात वयोवृद्ध आमदारांना उन्हाचा त्रास होऊ नये यासाठीची काळजी घेत आहोत. एखाद्या विरोधी आमदाराची प्रकृती बिघडली तर सरकारचे काही जाणार नाही. विनोद तावडेंनी पळसगावात येऊन आत्महत्याग्रस्त शेतक-याच्या मातेची विचारपूस करावी एसी गाडीतून आले तरी चालेल अशी प्रतिक्रिया आ. आव्हाड यांनी नोंदविली.  


आम्ही पळसगावच्या त्या शेतक-याला कर्जमुक्त करत आहोत २ लाखांची मदत पुढील काही दिवसात त्यांच्या खात्यात जमा होईल अशी पुष्टी त्यांनी जोडली. 


यात्रा शेतकरी संघर्षाची असली तरी शेतकरी हिताचा वसा सांगणारे सर्वच आमदार महागड्या लक्झरी गाड्यातून फिरत असल्याचे चित्र पुढील काही दिवस महाराष्ट्र अनुभवणार आहे.