पुणे : पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर तालुक्यातल्या बोरी-साळवाडी इथल्या नदीवरील पूल कोसळलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे जेमतेम २५ वर्षांपूर्वीच हा पूल बांधण्यात आला होता. मात्र एका महिन्यापूर्वी या पुलाला भेगा पडल्याने इथली वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. 


महाड दुर्घटनेनंतर राज्यातल्या ब्रिटीशकालीन पुलांचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे. पण हा नवा पूल कोसळल्यानं नव्या पुलांचा मुद्दाही आता निर्माण झालाय.


दरम्यान, हा पूल पडल्यानंतर नारायणगाव बेल्हा तसंच इतर गावांच्या वाहतुकीसाठी हा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गावकरी आणि विशेषतः शाळकरी मुलांचे मोठे हाल होत आहेत.