साईदिप ढोबळे, जुन्नर : लग्न समारंभ म्हटलं की पाहुणेरावळे, मानसन्मान ओघानं आलंच... पण, पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर नारायणगावमधला एक लग्न सोहळा याला अपवाद ठरला... या लग्न समारंभात सत्कारासाठी ना टोपी होती, ना फेटा, ना शाल-श्रीफळ... जुन्नरमधल्या शेतकरी संजय मेहेत्रेंच्या मुलीच्या लग्नात वऱ्हाडी मंडळीना केशर आंब्याच्या झाडाचं रोपटं भेट देण्यात आलं.


वऱ्हाडींना भेट 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेहेत्रे कुटुंबाचा हा लग्न सोहळा एवढा चर्चेचा ठरला की व्हॉट्सअप, फेसबुकवर त्याचीच चर्चा होती... सोहळ्याचे फोटोही व्हायरल झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंतही हे फोटो पोहोचले... आणि विशेष म्हणजे पंतप्रधानांनी आपल्या 'मन की बात'मध्ये मेहेत्रे कुटुंबाचं खास कौतुकही केलं. पंतप्रधानांनी कौतुक केल्यानं मेहेत्रे कुटुंबाला आनंद झालंय.


प्रतिष्ठा जपण्यासाठी विवाहसोहळ्यात लाखो-करोडो रुपये खर्च केले जातात... परंतु पैशांचा अपव्यय न करता सामाजिक भान जपत मेहेत्रे कुटुंबानं केलेलं काम इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.