मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधलं गळती सत्र काही केल्या थांबण्याची चिन्हं दिसत नाहीत. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकमधले मनसे नेते आणि पदाधिका-यांनी इंजिनाची साथ सोडली. तर दुस-या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कल्याण डोंबिवलीतल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या मनसेच्या रेल्वे इंजिनातून पायउतार झाल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कल्याण डोबिंबवली महापालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या वैशाली दरेकर आणि इतर महिला पदाधिका-यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.


वैशाली दरेकरांनी २००९ मध्ये मनसेतर्फे लोकसभा निवडणूक लढवली होती. नुकत्याच झालेल्या केडीएमसी महापलिका निवडणुकीत दरेकर यांना प्रभाग आरक्षण आणि पुनरर्चनेमुळे उमेदवारी मिळाली नव्हती. त्यावेळी त्यांना पूनर्वसनाचं आश्वासन राज ठाकरेंनी दिलं होतं. मात्र त्याची पूर्तना न झाल्यानं नाराज झालेल्या वैशाली दरेकर, महिला कार्यकर्त्यांसह अखेर शिवसेनेत डेरेदाखल झाल्या.