कल्याण : कल्याण शहरात निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उत्तर ठरणाऱ्या गोंविंदवाडी बायपासचं उद्घाटन लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक वर्ष रखडलेल्या गोविंदवाडी बायपास रस्त्याचं उदघाटन येत्या ७ तारखेला होण्याची शक्यता आहे. मात्र, त्याआधीच पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. या प्रकल्पात बाधित झालेल्या अधिकृत तबेला धारकांचं पुनर्वसन करण्याच्या न्यायालयीन आदेशची अंमलबजावणी करताना पालिकेनं शुद्ध फसवणूक केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी केला आहे.


या प्रकरणी तबेल्याच्या मालकांनी महापलिका आयुक्त आणि राज्य रस्ते महामंडळाला नोटीस धाडली आहे. रस्त्याचं उदघाटन करू नये अन्यथा न्यायालयाचा अवमान होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.


त्यामुळे काम पूर्ण होऊन उदघाट्नच्या प्रतिक्षेत असणारा गोविंदवाडी बायपास पुन्हा एकदा लांबणीवर जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


दरम्यान, या प्रकरणी आयुक्त इ रवींद्रन यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी कॅमेरा समोर बोलण्यास नकार दिला. पण पालिकेनं कुठलीही फसवणूक केलेली नाही. शिवाय तबेला मालकाची कुठलीही तक्रार केलीच नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.