कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत परिवहन समस्येवर वादळी चर्चा सुरू असताना बसपाच्या नगरसेविका मात्र मोबाईलवर गेम खेळताना मग्न होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिवहन समस्येवर महासभेत पोटतिडीकीने चर्चा सुरू होती. त्याचवेळी बसपाच्या नगरसेविका सोनी अहीरे मात्र मोबईलवर गेम खेळण्यात मग्न होत्या. २७ गाव विभागातून अहीरे बिनविरोध निवडून आल्या आहेत. सुमारे तासभर या विषयावर जोरदार चर्चा झाली असतानाच अहीरे मात्र गेम खेळण्यात मग्न होत्या.


याआधीही पालिकेत नगरसेवक गेम खेळताना दिसून आलेत. एकूणच नगरसेवक सभागृहात किती गंभीर आहेत हे पुन्हा एकदा दिसून आल्याची चर्चा पालिका परिसरात होती