अहमदनगर : एकेकाळचे आंदोलनातील सहकारी आणि सध्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध शुंगलू समितीनं केलेल्या आरोपांवर अन्ना हजारे यांनी दु:ख व्यक्त केलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अन्ना हजारे आणि अरविंद केजरीवाल यांच्यात आलेलं वितुष्ट काही क्षमण्याचं नाव घेत नाहीय. ते म्हणतात, 'केजरीवाल भ्रष्टाचाराच्या विरुद्ध लढाईत माझ्यासोबत होते... नवी पिढी देशाला भ्रष्टाचारमुक्त करण्यात सहकार्य करू शकते... असं मला वाटत होतं... पण माझं हे स्वप्न भंगलं'.  


जेव्हा केजरीवाल यांनी राजकीय पक्षाची (आम आदमी पार्टी) सुरुवात केली तेव्हा देवाची कृपा की त्यानं मला केजरीवाल यांच्यापासून दूर ठेवलं... नाही तर माझी प्रतिष्ठाही धुळीला मिळाली असती, असं अन्नांनी म्हटलंय. 


केजरीवाल मुख्यमंत्री बनल्यानंतर मला त्यांना भेटण्याची इच्छा जाली नाही... आत्ता मला समजतंय की ते मला 'गुरु' म्हणून का संबोधत करत होते... पण, देवानंच मला वाचवलं, असं म्हणत अन्नांनी केजरीवाल यांच्यावर नाराजी व्यक्त केलीय.