खारेगाव फाटकावरील रेल्वे ओव्हर ब्रिजचं काम सुरू
कळवा, खरेगाव आणि डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचे तसंच रहिवाशांचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो बळी घेणाऱ्या खारेगाव रेल्वे फाटकावर रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
ठाणे : कळवा, खरेगाव आणि डोंगरावर वसलेल्या झोपडपट्टीवासियांचे तसंच रहिवाशांचं स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शेकडो बळी घेणाऱ्या खारेगाव रेल्वे फाटकावर रेल्वे ओव्हर ब्रिज उभारण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.
या धीम्या मार्गावर 5 तासांचा विशेष ब्लॉक घेऊन रेल्वे प्रशासनाने या कामाला सुरुवात केलीय. 700 टनाच्या मोठ्या क्रेन द्वारे पिलरवर प्रत्येकी 4 टनाचे एकूण 6 गर्डर टाकण्यात आले.
यावेळी खासदार श्रीकांत शिंदे आणि रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कळवा, खरेगाव तसेच फाटका पलीकडील गोलाई नगर, भास्कर नगर,शिवशक्ती नगर, आतकोनेश्वर नगर, वाघोबा नगर, परिसरातील हजारो रहिवाशांना दिलासा मिळालाय.