अलिबाग : रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधल्या तीनविरा इथं खारेपाट महोत्सवाची धूम सुरू झाली आहे. झेप संस्थेच्या माध्यमातून होणा-या या महोत्सवाचं उदघाटन, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाच दिवस चालणा-या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. रायगडच्या खारेपाट विभागातल्या आगरी, कोळी, आदिवासी संस्कृतीचं, तिथल्या चालीरीतींचं दर्शन यातून घडवण्यात येणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या हेतूनं 200 हून अधिक महिला बचतगटांना या ठिकाणी स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 


तसंच रायगड जिल्हयातल्या किर्तीवंतांची गाथा इथं दृश्य स्वरूपात साकारण्यात आली आहे. स्थानिकांच्या कबडडी, कुस्तीच्या स्पर्धांबरोबरच, या महोत्सवाला भेट देणा-या प्रेक्षकांसाठी सुद्धा इथे स्पर्धांचं आयोजन करण्यात आले आहे.


बुलेट राणींचा उत्तुंग परफॉर्मन्स



नऊवारी साडीतील पारंपरिक वेशातील सुमारे 30 ते 35 मुलींचा बुलेट राणी परफॉर्मन्स महोत्सवात उपस्थितांच्या डोळयांचे पारणेच फेडणारा ठरला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आगमनानंतर या बुलेट राणींच्या रायडिंगला सुरुवात झाली.