प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : खेड तालुक्यातील सुखदरची यात्रा म्हणजे हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक.. दोन दिवस ही यात्रा दिवस रात्र सुरू असते... यात्रेत पालखी नाचवण्याची अनोखी परंपरा पहायला मिळते...पाहूयात कशी असते ही यात्रा...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खेड तालुक्यातल्या सुखदर गावची यात्रा म्हणजे अवघ्या पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...दरवर्षी अगदी न चुकता पौष पौर्णिमेलाच ही यात्रा भरते... जवळपास दोनशे वर्षांपूर्वी एका मुस्लिम भाविकामुळे सुखदरच्या भवानी देवीच्या ही यात्रा सुरू झाल्याचं सांगण्यात येतं. हिंदू-मुस्लिम एकतेचं प्रतीक समजल्या जाणारी भवानी मातेची ही यात्रा कशी सुरु झाली त्याची एक आख्यायिका सांगितली जाते. या ठिकाणी सर्व धर्मातील नागरिक दर्शनासाठी येतात...


भवानी मातेचा नवस फेडताना गा-हाणं घालण्याची प्रथा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे 


भवानी देवीच्या प्रांगणात 4 भेलाची झाडं आहेत...आणि एक मोठा दगड आहे...याठिकाणी बसन भाविक नवस बोलत असल्याची परंपरा असल्याचं ग्रामस्थ सांगतात...


भवानी मातेच्या शेजारीच एकीवली देवीची मूर्ती आहे... विशेष म्हणजे देवीच्या भेटीसाठी महामाई, काळकाई आणि मानाईची पालखी येते. भवानी मातेच्या देवळाभोवती पाच प्रदषिणा घातली जाते आणि मग सुरू होतो ते पालखी नाचवण्याचा कार्यक्रम...


भवानी मातेच्या यात्रेत खेळण्यांपासून चायनीज सेंटरपर्यंत दुकानं थाटण्यात आलीयत...काही दुकानदारांची तिसरी पिढी व्यवसाय करत असल्याचं दिसून आलं. 


अशी ही आगळीवेगळी कोकणातली यात्रा पहायची असेल तर एकदा तरी सुखदरची यात्रेला भेट द्यायलाच हवी...