धुळे : नागपूर सूरत महामार्गावर पहाटेच्या नंदुरबार जिल्ह्यातील कोंडाईबारी घाटाजवळ वैष्णवी ट्रॅव्हेल्सच्या बस उलटल्यानं दोघांचा मृत्यू झालाय. तर ३२ जखमी झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बसमधले सर्व प्रवासी गुजरातची राजधानी अहमदाबादचे  रहिवाशी आहेत. ते पर्यटनासाठी महाराष्ट्रात आले होते. आज पहाटेच्या सुमारास घाटाजवळ चालकाचा गाडीवरचं नियंत्रण सुटलं. बस तीन ते चार कोलांटउड्या घेतल्या. यातील बहुतांश प्रवासी झोपेत असल्याने बेसावध अवस्थेत त्यांना जबर मार लागला आहे. 


या अपघातातील जखमींवर विसरवाडी ग्रामीण रुग्णालयासह,  नंदुरबार आणि धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. चालकानं मद्यप्राशन केलं होतं. त्याचप्रमाणे भरधाव वेगाने गाडी चालवत होता, असा आरोप जखमी प्रवाशांनी केलाय.