कोल्हापूर : गुळाची बाजारपेठ देशपातळीवर प्रसिद्ध आहे. या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होते. मात्र  गुळ उत्पादक शेतकरी आणि गु-हाळघर मालक यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच आता नोटबंदीमुळे गुळ उत्पादकांसमोर संकटाची नवी मालिका उभी राहिली असून गु-हाळ चालवायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.


गु-हाळघर मालकांनी नोटबंदीचं स्वागत करुन हा व्यवसाय चालविण्यासाठी चेकचा पर्याय निवडला.मात्र बँकेत चेक भरण्यापासून ते पैसे काढण्यापर्यंत  असलेल्या रांगा आणि पैसे काढण्यावर असलेल्या निर्बंधामुळे गु-हाळघर चालकांच्या उत्साहावर विरजण पडलं आहे.


गु-हाळ मालकांनी मजुरांना चेकव्दारे मजुरी दिली मात्र  चेक वटण्यासाठी बँकेत तासनतास रांगेत उभे राहूनही पैसे मिळत नसल्याचं चित्र आहे.