प्रताप नाईक, कोल्हापूर : दिवाळीत चायनिज गोष्टी वापरु नका असं आवाहन केलं जातंय. या चायनीज वस्तूंना पर्याय काय याचं उत्तर मात्र कुणाकडेही नाही. आता, मात्र चायनीज लायटिंगवर पर्याय शोधून काढलाय तो कोल्हापूरच्या उद्योजक कुटुंबानं...


कोल्हापूरकरांची बातच न्यारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरकर जे काही करतात ते खास आणि तितकंच वेगळं असतं... आता हेच पाहा ना... आकर्षक लायटिंग... टिकाऊ आणि तितक्याच लख्ख प्रकाश देणाऱ्या लायटिंगच्या माळा... या माळाचं खास वैशिष्ट्य म्हणजे या बनल्यात एलईडी बल्बपासून... चायनीय लाईटिंगच्या तोडीस तोड आणि तितक्याच टिकाऊ अशा या लायटिंगच्या माळा बनवल्यात कोल्हापुरातल्या शिवाजीराव डफळे आणि कुटुंबीयांनी... कोल्हापुरी लायटिंग नावानं प्रसिद्ध होत असलेल्या या लायटिंगला कोल्हापूरसह बेळगाव, गोवा आणि इतर राज्यातून चांगली मागणी आहे.


कोल्हापुरी लायटिंग...


शिक्षणाची फारशी ओळख नसलेल्या महिलांना या व्यवसायामुळं रोजगारही मिळालाय. या माळांमुळं वीजेची बचत तर होतेच शिवाय चायनिय लायटिंगच्या तुलनेत त्या बरेच वर्षे टिकतात. त्यामुळं ग्राहकांकडूनही कोल्हापुरी लायटिंगला मागणी वाढतेय.


दिवाळी असो किंवा इतर सण... रोषणाईचं महत्त्व ओळखून बाजार 'मेड इन चायना' लाईटनं झाकोळून गेला. मात्र, दुकानातून बाहेर पडल्यावर या लायटिंगची गॅरंटी नाही असं सांगून त्याची विक्री होतच राहिली. मात्र आता डफळे कुटुंबीयांच्या कोल्हापुरी लायटिंगनं चायनिज लायटिंगला पर्याय उपलब्ध करुन दिलाय. त्यामुळं 'मेड इन चायना' लायटिंगवर बहिष्कार टाकणं आणखी सोप्पं झालंय.