अहमदनगर : कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. सरकारी वकील उज्वल निकम यांनी कोपर्डी घटनेतील आरोपींवर बलात्कार आणि खूनाचा कट केल्याचा आरोप ठेवला होता. 


याप्रकरणी तिसरा आरोपी नितीन भैलुमे याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र त्याचा हा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. खटल्यातील साक्षीदार तपासणीला सुरुवात झालीये. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासणार आहेत.