अहमदनगर : कोपर्डी प्रकरणी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात युक्तीवादाला आजपासून सुरूवात झाली. या प्रकरणात एकूण ७० साक्षीदार तपासले जाणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्व तीन आरोपींवर बलात्कार आणि  खूनाचा कट केल्याचा आरोप ठेवण्याचा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तीवाद केला. हत्येच्या ४ ते ५ दिवसांपूर्वी जितेंद्र शिंदेनं पीडित मुलीची छेड काढली होती आणि त्यास संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे यांनी प्रोत्साहन दिलं होतं. मात्र पीडित मुलीनं छेड काढण्यास विरोध केल्यानं भवाळ आणि भैलुमे यांनी बदला घेण्याची धमकी दिली होती. त्यानंतर १३ जुलैला संध्याकाळी बलात्कार आणि हत्या करण्यात आली. 


तिन्ही आरोपींवर कट करुन बलात्कार आणि हत्येच्या गुन्ह्याप्रकरणी शिक्षा करण्याची मागणी निकमांनी केलीय. त्या संदर्भात ड्राफ्ट चार्ज सबमिट करण्यात येणार आहे. तर आरोपी नितीन भैलुमेच्या जामिनावर उदया सुनावणी होणार आहे.