कोपर्डी बलात्कार प्रकरणाची सुनावणी सुरू
कोपर्डी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या प्रकरणी आजपासून न्यायालयात सुनावणी सुरुवात झालीय.
अहमदनगर : कोपर्डी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन खून केल्याच्या प्रकरणी आजपासून न्यायालयात सुनावणी सुरुवात झालीय.
अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात हा खटला चालवण्यात येतोय. याप्रकरणी नुकतचं आरोपपत्र दाखल करण्यात आलं असून आरोपींवर बलात्कार आणि हत्येचा आरोप लावण्यात आलाय.
विशेष सरकारी वकील उज्वल निकम या खटल्यात सरकारची बाजू मांडत आहेत. सुनावणीसाठी विशेष फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्यात आलंय.