कुडाळच्या नगरपंचायतीवर राणेंचं वर्चस्व
राज्यातल्या सहा नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. साऱ्या राज्याचं लक्ष असलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत नारायण राणेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय.
सिंधुदुर्ग : राज्यातल्या सहा नगरपंचायतींचे निकाल आज जाहीर झाले. साऱ्या राज्याचं लक्ष असलेल्या कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत नारायण राणेंनी आपलं वर्चस्व कायम ठेवलंय.
17 पैकी 9 जागा जिंकून राणेंनी काँग्रेसची सत्ता निश्चित केलीय. तर शिवसेनेला 6 आणि भाजपला 1 जागा मिळालीय. एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकून आलाय.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राणेंना सिंधुदुर्गात चांगलाच धक्का बसला होता. कुडाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपनं मोठी ताकद उतरवली होती. पण सेना-भाजप एकत्र नसल्यामुळे मतविभाजन झाल्याचं निकालावरून स्पष्ट होतंय.
दुसरीकडे सोलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्चस्वाला चांगलाच धक्का बसलाय. मोहळ, माळशिरस आणि माढा या तिन्ही नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसनं सपाटून मार खालाय. माढा नगरपंचायतीवर भाजप पुरस्कृत साठे गटाचं वर्चस्व प्रस्थापित झालंय. तर मोहळमध्ये शिवसेनेला सत्ता मिळालीय. माळशिरसमध्येही भाजपनं 17 पैकी 10 जागांवर विजय मिळवलाय.