शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची लातूरमधल्या एका कार्यक्रमात जीभ चांगलीच घसरली. राज्य सरकारला बदनाम करणा-यांकरता त्यांनी  शिवराळ भाषा वापरली. 


पाहा नेमकं काय म्हणाले कांबळे....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला. राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. यावेळी झालेल्या भाषणात राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा तोल ढळला. विरोधी पक्षातले काही जण सरकार विरोधात घोषणाबाजी करतात. त्यांनी आपल्या समोर घोषणा द्याव्यात आपण त्यांचे मुस्काट फोडू असा दमच, दिलीप कांबळे यांनी भरला. एवढ्यावरच न  थांबता, जातीवाचक विधानही त्यांनी केलं. 


 दरम्यान होळी असल्यामुळे दिलीप कांबळे यांचं विधान कोणी मनावर घेऊ नये अशी सारवासारव, कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी केली. 


 फडणवीस सरकारमध्ये सामाजिक न्याय या महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी राज्यमंत्री दिलीप कांबळे सांभाळतात. मात्र सामाजिक भान विसरून जातीवाचक आणि शिवराळ भाषेत बोलल्यामुळे उपस्थितांमधून आश्चर्य व्यक्त केलं गेलं.