मुंबई : पश्चिम उपनगरात मालाडजवळ मेट्रोच्या कामामुळे सीएनजी गॅस पाईपलाईन फुटल्याला आता दोन दिवस उलटलेत. पण गॅस गळती थांबली असली,तर या घटनेचे परिणाम अजूनही सामन्य जनजीवनावर होत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मालाड ते भाईंदर परिसरातले १८ सीएनजी पंप दोन दिवसांपासून बंद आहेत. याचा सर्वात मोठा फटका रिक्षा वाहतूकी होत आहे. पश्चिम उपनगरातल्या बहुतांश रिक्षा आज दुसऱ्या दिवशी सीएनजी उपलब्ध नसल्यानं ठप्प आहेत. 


अंधेरी, गोरेगाव, बांद्रा परिसरात जिथे सीएनजी उपलब्ध आहे तिथे लांबच लांब रांगा आहेत. रिक्षाची सेवा ठप्प असल्यानं नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. गर्दीच्या वेळी बेस्टच्या बसमध्ये तुफान गर्दीत प्रवास करावा लागत आहे. 


आज संध्याकाळपर्यंत पाईपलाईनची दुरुस्ती होईल, अशी शक्यता आहे. ऐन परीक्षाच्या काळात रिक्षा मिळत नसल्यानं विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.