पुणे : विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातून अनिल भोसले यांना अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, माजी आमदार विलास लांडे यांनी दंड थोपटले आहेत. त्यांनी अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज दाखल केलाय. त्यामुळे राष्ट्रवादीला बंडखोरीमुळे ही निवडणूक जड जाण्याची शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, अजित पवार यांनी लांडे यांनी इशारा दिला आहे. विलास लांडे आणि त्यांच्या पत्नीला राष्ट्रवादी पक्षाने भरपूर पदे दिली आहेत. त्यांनी विधानपरिषद निवडणुकीत अपक्ष तिकीट भरण्याच्या फंदात पडू नये, असंही पवारांनी म्हटले आहे. 


दरम्यान, जळगावमधून गुलाबराव देवकरांनी अर्ज दाखल केला आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत अनिल भोसलेंनी पुण्यातून अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचा 3-3 जागांचा फॉर्मुला अजित पवारांनी धुडकावून लावला.


सन्मानपूर्वक आघाडीचा प्रस्ताव दिला होता. मात्र सिटींग जागा आम्ही कशा सोडणार, असा सवाल अजित पवारांनी काँग्रेसला विचारला आहे. नांदेड आणि यवतमाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अपक्षांना पाठिंबा देणार असल्याची माहितीही अजित पवारांनी दिली आहे.