नागपूर : कोराडी परिसरात एका बिस्कीट कंपनीत बिबट्या शिरल्याने खळबळ उडाली. नागपूरच्या कोराडी मार्गावरील सुंदर बिस्कीट कंपनीत आज सकाळी कर्मचारी आल्यावर त्यांना हा बिबट्या दिसला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिबट्याला पाहताच कर्मचारी तातडीने कंपनीबाहेर पडले. बिबट्या पकडण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत आहेत. मात्र विस्तीर्ण परिसर असल्यामुळे हा बिबट्या पकडण्यात अजून यश आलेलं नाही. 


बिबट्याच्या पावलांच्या खुणा सापडल्या आहेत. सीसीटीव्ही बिबट्या दिसतोय. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोराडीचा परिसर जंगलालगत नसल्यामुळे या भागात बिबट्या आल्यामुळे नागरिकांत भितीचे वातावरण आहे.