नाशिक : नाशिकमधला मराठी भाषा दिनाचा कुसुमाग्रज प्रतिष्ठानातला महापालिकेचा कार्यक्रम रद्द झाल्याची बातमी झी 24 तासवर झळकल्यावर अवघ्या काही तासातच कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी रोषणाईचं काम सुरू झालंय. 


दरवर्षी कुसुमाग्रज प्रतिष्ठानमध्ये महापौरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि अभिवादन केलं जातं. पण यंदा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. त्यासंदर्भात झी 24 तासनं 11 वाजता बातमी दाखवली...त्यानंतर प्रशासनाला जाग आलीय...आणि रोषणाईच्या कामाला सुरूवात झालीय....