मीरा भाईंदर : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आलीय. उत्तनच्या खाडीत असलेल्या देशी दारु भट्टीवर ही कारवाई करण्यात आलीय.


उत्तन सागरी पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत 10 हजार लीटर देशी दारू जप्त करण्यात आलीय. दोन किमीच्या खाडीत तिवरांच्या जंगलात ही देशी दारुची भट्टी सुरू होती. शनिवारी रात्री कारवाई करण्यात आलीय.