मुंबई : महाराष्ट्रावर अस्मानी आणि सुल्तानी संकटं एकाच वेळी येऊन पडली आहेत. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सूर्य नारायणानं पुन्हा एकदा तळपायला सुरूवात केली आहे. अनेक ठिकाणी पारा 45 अंशाच्या जवळ जाऊन पोहचला आहे. तर तिकडे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला आहे.


पुढच्या 48 तासात आणखी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. वातावरणाचा हा खेळ कमी होता की काय म्हणून राज्यात अवकाळी भारनियमनही सुरू झालं आहे. राज्यात अचनाक 2 हजार मेगावॉटची मागणी वाढल्यानं ग्रामीण भागात अचनाक मोठ्याप्रमाणात लोडशेडिंग सुरू झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात घरात अंधार आणि ढगात वीज अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे.