लोणावळा : पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर एक सुमो गाडी ओढ्याचे संरक्षक कठडे तोडून सुमारे 20 फूट खाली कोरड्या ओढ्यात कोसळली. यामध्ये दोघांचा मृत्यू झालाय तर इतर 4 गंभीर आणि दोघे किरकोळ जखमी झालेत. सकाळी 7 च्या सुमारास हा अपघात झाला. 


जखमींना निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातग्रस्त सुमोमधील लोक हे शनी शिंगणापूर या ठिकाणी दर्शनाला गेले होते. तेथून मुंबईकडे परतत असताना सकाळच्या सुमारास चालकाला झोप लागल्याने हा अपघात घडला असावा, असे पोलिसांनी सांगितले.