अलिबाग : रायगड जिल्ह्यातील लोणेरे इथल्या खासगी शाळेच्या कारकूनाने शाळेच्या कार्यालयातच आत्महत्या केली. मंगेश घागडे असं या कारकूनाचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगेश गेल्या 7-8 वर्षांपासून लोणेरे इथल्या एस. एस. निकम विद्यालयात कार्यरत होते. कामासाठी रोहा इथं जात असल्याचे सांगून मंगेश घराबाहेर पडले. मात्र बराच वेळ परतले नसल्याने शोधाशोध सुरु झाली. यावेळी त्यांचा मृतदेह शाळेच्या खोलीतच सापडला. त्यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्म हत्या केल्याचं समोर आले आहे.


शाळेतल्या टेबलवर एक सुसाईड नोटही आढळलीय. शाळेच्या मुख्याध्यापकाने हिशेबातील पैसे न दिल्याने आत्महत्या करत असल्याचे घटनास्थळावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये आढळले आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.