नाशिक : पुन्हा एकदा नाशिक हत्येनं हादरलयं. एकतर्फी प्रेमातून युवतीची हत्या करुण मुलाने स्वत:वर धारधार शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना पळसे गांवात घडली आहे. गेल्या काही दिवसापासून नाशिकात हत्या सत्र सुरूच असून 10 दिवसातली ही पाचवी हत्या आहे. त्यामुळे नाशिककरांमधे भितीचे वातावरण आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ज्योती थेटे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. शशिकांत शांताराम टावरे असे या गंभीर जखमी झालेल्या प्रियकराचे नाव आहे, नाशिकच्या शिंदे-पळसे गांवात रात्री ही घटना घडली आहे. या घटनेत जखमी असलेल्या शशिकांतवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत नाशिकच्या नाशिक रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विशेष म्हणजे एकीकडे नाशिकमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन सुरु असताना दुसरीकडे ही घटना घडली त्यामुळे नाशिकमध्ये पोलिसांचा धाक उरला नसल्याची भावना नागरिकांमध्ये आहे.