प्रेयसीचे अश्लिल फोटो फेसबूकवर टाकले प्रियकराने...
सोशल नेटवर्किंग साईट्सवर फोटो अपलोड करताना सावधान ! कदाचित तुमचीही होऊ शकते फसवणूक...
प्रणव पोळेकर, झी मीडिया, रत्नागिरी : सोशल नेटवर्किंग साईट्सवर फोटो अपलोड करताना सावधान ! कदाचित तुमचीही होऊ शकते फसवणूक...
जगभरातील इंटरनेट यूजर्स फेसबुकच्या माध्यमातून एकमेकांच्या अगदी जवळ आलेत. मात्र याच फेसबुकचा वापर करून रत्नागिरीतल्या एका तरूणानं त्याच्या प्रेयसीला फसवलंय.
प्रभावी माध्यम समजल्या जाणा-या सोशल नेटवर्किंग साईट्सनी संस्कृतीच्या भिंती भेदून जगाला जवळ आणलं पण याच सोशल साईट्सची दुसरी काळी बाजू देखील आहे...त्याचाच प्रत्यय रत्नागिरीतल्या एका तरुणीला आलाय...ज्याच्यावर प्रेम केलं त्याच प्रियकरानं तिचे अश्लील फोटो फेसबुकवर तिच्याच नावाचं बनावट अकाऊंट तयार करून अपलोड केल्याचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी सांगितले.
संबंधित मुलीनं 15 दिवसांपूर्वी मुंबईत तक्रार दाखल केली होती...पोलिसांसमोर खरं आव्हान होतं ते आरोपीला शोधण्याचं... कारण नेमकं हे अकाऊंट कोण वापरत होतं याचा थांगपत्ता पोलिसांना लागत नव्हता... रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडे हे प्रकरण ज्यावेळी आलं त्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि रत्नागिरीच्या पाली गावात जाऊन आरोपीला बेड्या ठोकल्या. आरोपी केदार हा उच्चशिक्षित आहे.
त्यामुळेच सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करताना सावधान अन्यथा तुम्हीही फसवले जाऊ शकता....