इंदापूर : पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर लक्झरी बसला झालेल्या भीषण अपघातात ४ जण ठार झालेत तर १३ जण जखमी झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महामार्गावरील इंदापूरजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मुंबई-हैदराबाद या लक्झरी बसचा अपघात झाला. यात चार जण जागीच ठार झाले तर १३ जखमी झालेत. जखमींमध्ये तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजतेय. 


दरम्यान, या अपघातातील मृत तसेच जखमी व्यक्तींची अधिक माहिती मिळू शकलेली नाही.