सातारा : जर या उन्हाळ्यात आल्हाददायक वातावरणाचा आनंद घ्यायचाय म्हणून महाबळेश्वरला ज्यायचा विचारात असाल तर लगेच हा विचार बदला. कारण यंदा महाबळेश्वरचं तापमान वाढले. ते एकदम हॉट झालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तापमान वाढलंय असं नाही तर महाबळेश्वरमध्ये मुंबईपेक्षा जास्त पारा चलढला आहे. 13 एप्रिलला महाबळेश्वरचं तापमान होतं 35.9 अंश सेल्सियस तर मुंबईतलं तापमान होतं 34.8 अंश सेल्सियस आहे. 


सौराष्ट्रातल्या उष्ण वाऱ्यामुळं हील स्टेशन्सवरच्या तापमानात वाढ झाली.  गेल्या पाच सहा दिवसांपासून हील स्टेश्नवरच्या तापमानात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर राज्यात कोकण, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणीही कमालीचे तापमान वाढले आहे. अंगाची काहीली काहीली होत आहे.