आजारी वडिलांना पाहायला निघाले आणि...
महाडजवळील हरिहरेश्वर आणि केंबुर्ली येथे प्रत्येकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून त्यांची ओळख पटली आहे. या दोघीही एकमेकांच्या नातेवाईक आहेत.
महाड : महाडजवळील हरिहरेश्वर आणि केंबुर्ली येथे प्रत्येकी एका महिलेचा मृतदेह सापडला असून त्यांची ओळख पटली आहे. या दोघीही एकमेकांच्या नातेवाईक आहेत.
केंबुर्ली येथील सापडलेला मृतदेह हा रंजना संतोष वाजे यांचा असून त्या रत्नागिरी जिल्हयातील सापु गुहागर येथील रहिवासी आहेत. त्या त्यांच्या आजारी वडिलांना भेटायला चालल्या होत्या. पण वाटेतच त्यांच्यावर काळानं घाला घातला.... आणि आज त्यांच्या आजारी वडिलांचंही निधन झालं.
तर हरिहरेश्वर येथील मृतदेह शेवंती मिरगल यांचा असून त्या मृत रंजना यांच्या काकी आहेत. या दोघी तवेरा गाडीतून प्रवास करीत होत्या . त्यामध्ये एकूण 7 प्रवासी होते.