महाड दुर्घटना : आणखी दोन मृतदेह सापडले
महाडमधील सावित्री नदीच्या पुलावर झालेल्या दुर्घटनेतील आणखी दोन जणांचे मृतदेह सापडलेत.
महाड : महाडमधील सावित्री नदीच्या पुलावर झालेल्या दुर्घटनेतील आणखी दोन जणांचे मृतदेह सापडलेत.
दुर्घटना घडल्यानंतर चौथ्या दिवशीही शोधकार्य सुरु असून आज आणखी दोन मृतदेह सापडलेत. हे दोनही मृतदेह पुरुषांचे आहेत. या दोनही मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.
एक मृतदेह म्हाप्रळ पुलाजवळ सापडलाय. तर दुसरा मृतदेह आंबेत खाडीत सापडलाय. आतापर्यंत या दुर्घटनेतील 24 जणांचे मृतदेह हाती लागलेत.
मंगळवारी रात्री सावित्री नदीचा पुल कोसळल्याने भीषण दुर्घटना घडली होती. यात दोन एसटी बसेस तर काही खाजगी वाहने वाहून गेली होती.