महाड पूल दुर्घटना : एसटीतील बेपत्ता प्रवाशांची नावे
सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे.
मुंबई : मुंबई-गोवा महामार्गावरील सावित्री नदीवरील महाड-पोलादपूर दरम्यानचा ब्रिटीशकालीन जुना पूल मुसळधार पावसात वाहून गेला. याचवेळी या पुलावरून जाणारी दहा ते १५ वाहने पुरात वाहून गेल्याची भीती आहे. यात दोन एसटी वाहून गेल्यात. सावित्री नदीला आलेल्या पुरामुळे हा पूल वाहून गेल्याची प्राथमिक माहितीआहे. एसटीतील बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्यात येत आहे. एसटी महामंडळाने एक प्रसिद्ध पत्रक काढून प्रवाशांची माहिती दिली आहे.
बेपत्ता प्रवाशांची नावे :
जयगड - मुंबई (MH20 BN1538)
चालक - एस. एन. कांबळे
वाहक - विलास देसाई (फुणगूस)
राजापूर -बोरीवली (MH40N 9739)
चालक - जी. एस. मुंडे
वाहक - प्रभाकर भानूराव शिर्के (बि.नं. १३८०७), राजवाडी, संगमेश्वर
जयगड - मुंबई एसटीतील प्रवासी
- प्रशांत प्रकाश माने-भांडरपुळे,
- सुनील महादेव बैकर,
- स्नेहल सुनील बैकर - सतकोंडी,
- अविनाश सखाराम मालप
- चालक एस एस कांबळे यांचा मुलगा
- दीपाली कृष्णा बलेकर,
- अनिल संतोष बलेकर,
- धोंडू बाबाजी कोकरे
- भूमी भूषण पाटील
- सुरेश नेमाजी सावंत
राजापूर -बोरीवली एसटीतील प्रवासी
- आतीफ मेमन चौगुले,
- आबेद अल्ताफ चौगुले हे दोघे - काविळतळी, ता. चिपळूण
- बाळकृष्ण बाब्या वरक- नाणार ता. राजापूर
- जयेश बाणे (३६)- सोलगाव, राजापूर ,
- श्री. वाघू
- अजय सीताराम गुरव - ओणी, राजापूर
- जितू जैतापकर (३२) -राजापूर
दरम्यान, रमेश कदम, रा.नांदिवसे ता.चिपळूण हे दि. २ ऑगस्ट २०१६ रोजी मुंबईला निघाले होते. परंतु आतापर्यंत त्यांच्याशी संपर्क होत नाही. ही माहिती जिल्हा नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
हेल्पलाईन नंबर :
एसटी प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी प्रशासनातर्फे ०२१४१-२२२११८ व १०७७ हे दोन संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत.
तसेच अन्य संपर्कासाठी क्रमांक
- रायगड जिल्हा नियंत्रण कक्ष : 1077
- मुंबई सेंट्रल बस स्थानक : 022 23074272 / 23076622
- महाड बस स्थानक : 02145 222139 / 222102
- पोलादपूर बस स्थानक : 02191 240036
- चिपळूण बस स्थानक : 02355 252003 / 252167
- रत्नागिरी बस स्थानक: 02145 222102/ 222253
- राजापूर बस स्थानक: 02353 222029 / 222218