महाड पूल दुर्घटना : शोधकार्यात सिंधुदुर्ग मच्छिमार आणि स्कूबा डायव्हिंगची मदत
महाड पूल दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयातून मच्छीमार संस्थेचे कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने इथं येवून स्कूबा डायव्हिंग तसेच जाळी लावण्याचे काम करत आहेत.
महाड : महाड पूल दुर्घटनेनंतर विविध शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा शोध आणि बचाव कार्यात गुंतल्या आहेत. वेगवेगळया संस्था संघटनाही यात मागे नाहीत. सिंधुदुर्ग जिल्हयातून मच्छीमार संस्थेचे कार्यकर्तेही स्वयंस्फूर्तीने इथं येवून स्कूबा डायव्हिंग तसेच जाळी लावण्याचे काम करत आहेत.
आणखी दोन जणांचे मृतदेह सापडले
महाड दूर्घटनेतील बेपत्ता प्रावाशांपैकी आज आणखी दोन जणांचे मृतदेह सापडलेत. हे दोनही मृतदेह पुरूषांचे असून बेपत्ता टवेरा गाडीचे चालक दिनेश कांबळी यांच्या मृतदेहाचाही त्यात समावेश आहे.. स्थानिक मच्छीमारांना म्हाप्रळ पुलाजवळ त्यांचा मृतदेह सापडला. तर आंबेत खाडीत सापडलेल्या मृतदेहाची अद्यापही ओळख पटलेली नाही.. आतापर्यंत २४ मृतदेह प्रशासनाच्या हाती लागले आहेत.
अनेक बेपत्ता नागरिकांचे नातेवाईक महाडमध्ये गर्दी करताय. महाड इथल्या ग्रामीण रूग्णालयात ४ डॉक्टरांचं पथक तयार आहे. तीसहून अधिक मृतदेह ठेवण्यासाठी व्यवस्था करण्यात आलीय.. खाडीकिनारी ठिकठिकाणी रूग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. महाड पूल दुर्घटनेत आतापर्यंत जेवढे मृतदेह सापडलेत त्यातील बहुतांश मृतदेह हे तिथल्या स्थानिक मच्छिमरांनी काढले आहेत.
आंबेत पूल आणि परिसरात मृतदेह सापडलेत
रत्नागिरी - रायगड या दोन जिल्हांना जोडणा-या म्हाप्रळ-आंबेत पुलाजवळ आतापर्यंत सात मृतदेह सापडलेत आणि हे सगळे इथले स्थानिक तरूण मच्छिमार यांनी आपल्या होड्या घेवून सावित्रीच्या प्रवाहाबाहेर काढलेत. मात्र एनडीआरएफ किंवा नेव्हीची एकही होडी या ठिकाणी ठेवण्यात आली नव्हती. काल एनडीआरएफचे जवान या ठिकाणी गेले मात्र ते पुन्हा माघारी परतले.
नदीचा प्रवाह बघता हे सगळे मृतदेह तब्बल ६० ते १५० किलोमीटरपर्यंत मिळतायत त्यामुळे हे सगळी शोध मोहीम आंबेत पूल आणि त्या परिसरात करणे गरजेचं होतं मात्र प्रशासन याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. एनडीआरएफच्या ५ बोटी आणि नेव्हीच्या ३ बोटी घटनास्थळापासून दहा किलोमीटरपर्यंतच गस्ती घालताना दिसत आहेत.
मात्र ज्या भागात सगळ्यात जास्त मृतदेह सापडतायत तिकडे होड्या नेताना दिसत नाहीत. आंबेत खाडीत जे सातही मृतदेह बाहेर काढले तो मुनीर शेख महमद मुकादम यांनी. बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी आता अत्याधुनिक कॅमेऱ्यांची मदत घेतली जाणार आहे.
अध्याधुनिक कॅमे-यांची मदत
आज सलग चौथ्या दिवशीही या दुर्घटनेतील बेपत्ता प्रवाशांची शोधमोहीम सुरुच आहे. आणि त्यासाठी अध्याधुनिक कॅमे-यांची मदत घेतली जाणार आहे. बोटीवर असे तीन अत्याधुनिक कॅमेरे लावण्यात येणार आहे. पाण्याखालचं ७०० फूट खोल आणि ४०० फूट रुंद भागाचं चित्रिकरण या कॅमे-यांद्वारे करता येणार आहे.. स्वता सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महाड येथील घटना स्थळाला भेट दिली आणि या शोध मोहिमेची पाहाणी केली.