`वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला`
पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
रायगड : पोलादपूर येथील रहिवासी आणि स्थापत्य अभियंता सुयोग शेठ यांनी पूल वाहून जाण्यास सावित्री नदीवर बेसुमार वाळू उपसा कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे.
वारंवार वाळू उपसामुळे पूलाचा पाया खचला आणि त्यामुळ पूल वाहून गेला असावा असा दावा सुयोग शेठ यांनी केला आहे. आम्ही स्थानिक रहिवासी वारंवार वाळू उपासावर बोललो पण यावर काहीच कारवाई झालेलं नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
पुलाच्या सुरक्षेचा कालावधी संपलेला होता. तरी पुलावरुन वाहतूक सुरु होती. त्यामुळे या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे.