नागपूर : ऐतिहासिक महाराजबाग प्राणी संग्रहालयातील अस्थायी कर्मचा-यांनी अखेर संप मागे घेतला आहे. सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले आहेत. महाराज बाग प्राणी संग्रहालयात 20 प्रजातींचे एकूण तीनशे पशु-पक्षी बंदिस्त असून कर्मचाऱ्यांच्या संपामुळे इथल्या प्राण्यांना खुराक देण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता.


हे प्राणी संग्रहालय पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अखत्यारीत असून विद्यपीठ अधिकाऱ्यांनी अस्थायी कर्मचाऱ्यांची रोजी 90 रुपयांवरून 110 रुपये केली. तसेच प्राण्यांच्या देखभालीकरता एक मदतनिसाची नेमणूक केल्यानं हा संप मिटला आहे. मात्र विद्यापीठाच्या अधिका-यांच्या या निर्णयाने कर्मचारी पूर्णपणे सहमत नाहीत. कर्मचाऱ्यांच्या नेमणुकी करता कायम स्वरूपी योजना करण्याची मागणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे.