नागपूरचे महाराजबाग प्राणी संग्रहालय पुन्हा एकदा वादात
विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असलेले नागपूरचे महाराजबाग प्राणी संग्रहालय पुन्हा एकदा वादात सापडले आहे. या प्राणी संग्रहालयातीळ २५ अस्थायी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे येथील मुक्या प्राण्यांचे हाल होते आहेत.
नागपूर : विविध कारणांमुळे सातत्याने चर्चेत असलेले नागपूरचे महाराजबाग प्राणी संग्रहालय पुन्हा एकदा वादात सापडले आहे. या प्राणी संग्रहालयातीळ २५ अस्थायी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. यामुळे येथील मुक्या प्राण्यांचे हाल होते आहेत.
ऐतिहासिक वारसा असलेल्या या प्राणी संग्रहालयात केवळ २ स्थायी कर्मचारी असून इतर २५ अस्थायी कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावरच हा डोलारा उभा आहे.एकूण व्यवस्थेकरता ७१ कर्मचारी नेमण्याकरता प्रस्ताव तयार झाला होता पण त्याच्यावर पुढे काहीच अंमलबजावणी झाली नाही. या प्राणी संग्रहालयात २० विविध प्रजातींचे सुमारे ३०० प्राणी-पक्षी आहेत. पंजाबराव कृषी विद्यापिठाच्या अंतर्गत हे प्राणी संग्रहालय असून तिकिटांच्या माध्यमाने मोठी रक्कम विद्यापीठाला मिळते.