परभणी | एटीएसकडून आयसीसच्या संशयित दहशतवाद्याला अटक
परभणी येथून आणखी एका आयसीसच्या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने अटक केलीये. 24 शाहिद खान असं या दहशतवाद्याचं नाव असून शाहिद हा पेशानं इंजीनिअर आहे.
परभणी : परभणी येथून आणखी एका आयसीसच्या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसने अटक केलीये. 24 शाहिद खान असं या दहशतवाद्याचं नाव असून शाहिद हा पेशानं इंजीनिअर आहे.
आज पहाटे महाराष्ट्र एटीएस ने ही कारवाई केलीये. गेल्या आठवड्यात परभणी येथून अटक केलेल्या आयसीसचा दहशतवादी नासीर चाऊस याचा शाहीद हा साथीदार आहे.
शाहिदकडून एटीएसनं रिमोट कंट्रोल बॉम्ब हस्तगत केलाय. कारच्या चावीचे रिमोट वापरुन शाहिदने हा बॉम्ब बनवला होता. शिवाय शाहिदकडून बॉम्ब बनवण्याचे साहित्य आणि १ किलो स्फोटकं देखील एटीएस ने हस्तगत केलीत.
शाहिदला परभणी कोर्टात हजर करणार आहेत. नासेर चाऊस आणि शाहिद प्रकरणी आणखी ५ जणांची चौकशी एटीएस चौकशी करत आहे.