बीड : मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात उष्माघातामुळे मंगळवारी एका १२ वर्षीय चिमुरडीला आपला जीव गमवावा लागलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठवाड्याला आता पाणीसंकट आणि तीव्र ऊन असं दुहेरी संकट झेलावं लागतंय. त्यातच पाणी टंचाईनं ग्रस्त असलेल्या बीडमध्ये पाण्यासाठी वणवण करताना एका चिमुरडीचा मृत्यू झालाय. साबलखेड गावात ही घटना घडलीय.


काय घडलं नेमकं?


१२ वर्षांच्या एका चिमुरडीनं पाणी आणण्यासाठी जवळच्या हातपंपावर भर उन्हात बऱ्याच फेऱ्या मारल्या. पाण्यासाठी ती हातपंपावर गेली असतानाच ती भर उन्हात कोसळली. 


इयत्ता पाचवीत ही चिमुरडी शिकत होती. योगिता अशोक देसाई असं तिचं नाव आहे. ती बीड जिल्ह्यातल्या साबळखेड गावात राहत होती. डॉक्टरांनी योगिताचा मृत्यू हार्ट अटॅक आणि उष्माघातामुळे झाल्याचं म्हटलंय. 


योगिताला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं... पण, तिला मृत घोषित करण्यात आलं.