गडचिरोली : महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारमध्ये मेडीगट्टा-कालेश्वर सिंचन प्रकल्पाबाबत करार झालाय. या करारानुसार गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच बॅरेजेस बांधण्यास तेलंगणाला मुभा देण्यात आली आहे. मात्र यामुळं अनेक गावं पाण्याखाली जाणार असल्याची भीती व्यक्त करत सिरोंचावासियांनी याला विरोध केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याबाबत संताप व्यक्त होत आहे. तेलंगणा सरकारविरोधात तो असून हा रोष गडचिरोलीच्या पालकमंत्र्यांविरोधातही आहे. विशाल मोर्चा काढून या आंदोलकांनी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारविरोधात एल्गार पुकारलाय.


गडचिरोलीत सिरोंचा तालुक्याच्या गोदावरी संगमस्थळावर तेलंगणा सरकारकडून मेडीगट्टा महासिंचन प्रकल्प उभारण्यात येतोय. मात्र गेल्या २ महिन्यांपासून सिरोंचा तालुक्यातल्या ग्रामस्थांनी या प्रकल्पाला उघड विरोध दर्शवलाय.


या प्रकल्पामुळं पावसाळ्यात तालुका बुडण्याची भीती व्यक्त होतेय.. याच पार्श्वभूमीवर तहसिलदारांना निवेदन देत मेडीगट्टा प्रकल्प रद्द करण्याची मागणी स्थानिकांनी केलीय..


एकीकडे या प्रकल्पाला विरोध होत असताना महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने या प्रकल्पाच्या करारावर संयुक्तपणे सह्या केल्या. 


दरम्यान, जिल्ह्यातील एटापल्ली भागातील देवदा इथं नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून या प्रकल्पाला विरोध दर्शविल्याने या आंदोलनाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तविली जातेय.