ठाणे : भिवंडीतील महेश डाईंगकंपनीला भीषण आग लागली. रात्री साडेतीनच्या सुमारास ही आग लागली. दरम्यान, आगीची छळ पोहोचू नये म्हणून २ इमारतीमधील रहिवाश्यांना तातडीने हलविण्यात आले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सहा गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्यात. या अग्नितांडवात कोणतीही जिवित हानी झाल्याचं वृत्त नसलं तरी मोठ्या प्रमाणावर वित्त हानी झाली आहे.


अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं असून सध्या कुलिंगचं काम सुरु आहे.