मोखाडा : महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुपोषणग्रस्त मोखाड्याचा दौरा केला. मोखाडा तालुक्यातल्या खोच इथं जावून कुपोषणाचे बळी ठरलेल्या सागर वाघ आणि ईश्वर सवरा यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या काही दिवसात या भागात कुपोषणामुळे तीन बालकांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी हा दौरा केला. काही दिवसांपूर्वी या गावात आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरांचा दौरा झाला होता. या दौ-यात श्रमजीवी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला होता. 


पंकजा मुंडे यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर श्रमजिवी संघटनेच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तसंच जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी जमावबंदी लागू केली होती. मात्र विरोधकांच्या वाढत्या टीकेनंतर जमावबंदीचा हा आदेश मागे घेण्यात आला.