यवतमाळ : यवतमाळमधल्या राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा-या नरभक्षक वाघानं आणखी एका गुराख्याचा फडशा पाडत चवथा बळी घेतला आहे.त्यामुळे परिसरातल्या गावांमध्ये कमालीची दहशत पसरलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राळेगाव परिसरात नरभक्षी वाघानं गुरा ढोरांसोबतच चार व्यक्तींना ठार केल्यानं ग्रामस्थ प्रचंड संतापले असून, वन विभाग, वन विकास महामंडळ आणि स्थानिक लोकप्रतिनिधींवर कमालीचा रोष व्यक्त केला जात आहे. तेजनी इथले प्रवीण पुंडलिक सोनवणे हे ऐन पंचविशीतले गुराखी या वाघाचा चौथा बळी ठरले. 


प्रवीण सोनवणे गुरे घेऊन तेजनी-बोराटी जंगल परिसरात गेले होते. तिथे गाई चारत असताना वाघानं त्यांच्यावर हल्ला केला. राळेगाव-पांढरकवडा-कळंब या तीन तालुक्यांच्या सीमेवर नरभक्षक वाघानं गेल्या दोन महिन्यांपासून धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकरी-शेतमजुरांनी भीतीपोटी शेतात जाणे बंद केले आहे. 


ग्रामस्थांचा रोष बघता आमदार अशोक उईके यांनी ग्रामस्थ आणि पांढरकवडा वनाधिकारीना पाचारण करून वाघाचा बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या. परिसरात एक वाघीण असून तिथे एक एका वाघाचा संचार असल्याचे वनाधिकाऱ्यांनी सांगितले.