नागपूर : नोटाबंदीमुळे नागपूरमध्ये एका व्यक्तीने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीये. अनंत बापट असे या 58 वर्षीय व्यक्तीचे नाव आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गळफास लावून घेण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नोटाबंदीमुळे आत्महत्येचे पाऊल उचलत असल्याचे म्हटलेय. याप्रकरणी त्यांच्या मुलाने पोलीस स्थानकात तक्रार दाखल केलीये.


मोदींनी आठ नोव्हेंबरच्या रात्री 500 आणि 1000च्या नोटांवर बंदीचा निर्णय जाहीर केला. नोटांवरील बंदीच्या निर्णयामुळे बापट यांचे व्यवसायात मोठे नुकसान झाले. यामुळेच आत्महत्या करत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिल्याची माहिती बापट यांच्या मुलाने केलेल्या तक्रारीत दिलीये.