मराठा क्रांती मोर्चाचं वादळ ठाणे जिल्ह्यातही
मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता ठाणे जिल्ह्यातही घोंघावतंय. सभा बैठकांच्या माध्यमातून ठाण्याच्या मराठा क्रांती मोर्चात सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
ठाणे : मराठा क्रांती मोर्चाचं वादळ आता ठाणे जिल्ह्यातही घोंघावतंय. सभा बैठकांच्या माध्यमातून ठाण्याच्या मराठा क्रांती मोर्चात सहभाग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
त्याचाच एक भाग म्हणून डोंबिवलीत मराठा समाजात जनजागृती करण्यासाठी दसऱ्याच्या मुहूर्तावर रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. चोळेगाव ठाकुर्ली इथून सुरू झालेली ही रॅली डोंबिवली पूर्व पश्चिम अशी फिरून शिवाजी महाराज पुतळा मनपाडा रोड इथे विसर्जित झाली.