बारामती : मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन आज पवारांचा बालेकिल्ला बारामतीत  करण्यात आलं होते.. या मोर्चात पवार कुटुंबियांसह बारामती आणि आसपासच्या तालुक्यातील मराठा बांधव सहभागी झाले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बारामती शहरातील कसबा येथील छत्रपती शिवाजी महारांजाच्या प्रतिमेला अभिवादन करुन मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चात सर्वात पुढे शाळा कॉलेजच्या मुली नंतर महिला भगिनी त्यानंतर वकिल डॉक्टर, जेष्ठ आणि त्यानंतर अन्य समाज बांधव असे स्वरूप दिसून आलं... 



मोर्चा शिवाजी उद्यान येथून सुरु झाल्यानंतर कऱ्हा नदी पुलावरून गुनवडी चौक, इंदापुर चौक, सिनेमा रोड मार्गे भिगवण चौक तीन हत्ती चौकातुन पूनावाला गार्डनसमोरून वसंतनगर मार्गे मिशन हायस्कूल ग्राउंडवर पोहोचला. 



याठिकाणी कोपर्डी घटनेतील अमानुष अत्याचाराला बळी पडलेल्या निर्भायाला आणि उरी येथे दहशतवादी हल्ल्यात शहिद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. मोर्चा शिस्तबद्ध पद्धतीने होण्यासाठी २५०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होतं...या मोर्चासाठी पोलिस खात्याकडूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता...