नागपूर : नागपूरमध्ये होणा-या मराठा क्रांती मूकमोर्चासाठी रेल्वे हवी असल्यास आयोजकांना 20 लाख रुपये आगाऊ भरावे लागणार आहेत. येत्या 14 तारखेला नागपूर विधान भवनावर मराठा क्रांती मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी सीएसटी ते नागपूर आणि वाशिम ते नागपूर अशी विशेष ट्रेन करण्यात आली होती.


नोटबंदी आणि मोर्चासाठी उरलेला कमी कालावधी यामुळे पैसे भरण्यासाठी आयोजकांपुढे मोठ्या अडचणी आहेत. हे पैसे भरल्यास 13 तारखेला विशेष ट्रेन सुटणार आहे.