हिंगोली : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी इथं अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार करुन तिची हत्या केल्याच्या निषेधार्थ हिंगोलीत मूक मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. लाखोंच्या संख्येने या मोर्चाला मराठा समाजातल्या नागरिकांनी उपस्थिती लावली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजातील सर्वसामान्य नागरिक, राजकीय नेते, पदाधिकारी,नोकरदार, प्राध्यापक, शिक्षक, डॉक्टर्स, वकील अशा सर्वच स्तरातील लोकांनी मूकमोर्चा काढला. उत्स्फुर्तपणे काढलेल्या या मोर्चात तब्बल एक ते दीड लाख लोकांनी सहभाग घेतला होता. 


लांबच लांब रस्त्याच्या दुतर्फा गर्दी असूनही रेटारेटी नाही. कोणत्याही प्रकारची घोषणाबाजी नाही, कुणा राजकीय नेत्याचे भाषणबाजीचे प्रदर्शन न करता मोर्चा काढण्यात आला.


हिंगोलीतल्या मोर्चाला विराट गर्दी